जय देव जय देव स्वामी समर्था।
ब्रह्मांडनायका तू युगकर्ता॥धृ॥
व्रत वैकल्याने काया झिजली।
पोथी ग्रंथामाजी बुद्धी शिणली॥
कर्मकांडी वृत्ती संभ्रमी पडली।
आत्मोद्धाराची वाट खुंटली॥१॥
ज्ञानियांचा राजा हरिपाठी सांगे।
कलियुगी नामाने उद्धार साधे॥
चहुवेदी जाण षट्शास्त्री कारण।
अठराही पुराणे हरिसी गाती॥
मंथुनी नवनीता तैसा घे अनंता।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग॥२॥
एका जनार्दनी नाथांनी लिहिले।
हरिनामे भूलोकी आत्मे उद्धरले॥
याग, योग, व्रत, नेम, दान, धर्म।
न लगे साधन जपता हरी॥
हरी मुखी गाता हरपली चिंता।
त्या नाही मागुता जन्म घेणे॥३॥
तुकयाने विठ्ठले वैकुंठ साधिले।
आत्मज्ञान सार्या भक्तांसी कथिले॥
तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत।
सेविले अमृत रामतीर्थ॥
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा।
पुनरपि संसारा येणे नाही॥४॥
नामदेव म्हणे नामाच्या हो संगे।
एकरूप झाला निज पांडूरंगे॥
तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ।
होईल कृतार्थ रामनामे॥
नामा म्हणे वैकुंठ नामेची जोडेल।
अंती तुज पावेल राम एक॥५॥
मनाचे कारणी जन्म आणि मोक्ष।
मनाच्या श्लोकास गाती रामदास॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे॥
अनाथासी आधार हा चक्रपाणि।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥६॥
प्रत्यक्षाप्रत्यक्ष पाचामुखी भेद।
भेदती दाळू स्वामी ज्यास॥
मायेच्या प्रेमात, कृपेच्या छायेत।
विरला न उरला भानुदास॥७॥
स्वामी समर्थांची आरती
contact us
naambhajanaamrut@gmail.com
+91-9987264949
© 2025. All rights reserved.